आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो
नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो .....
शोधले माझेच पत्ते आत मी माझ्या किती
जरा हरवलो तेव्हाच कोठे सापडाया लागलो .....
ठरवले हे पाहीजे, ते पाहीजे, ते ही हवे
मागण्या ताज्या तवान्या मी धकाया लागलो .....
मी सुखला पाळले बांधून दरी माझीया
ते सुखाने झोपले मी गस्त द्याया लागलो .....
गीत माझ्या लेखणीचे इतुके भिनले तिला
ती लिहाया बैसली अन मी सुचाया लागलो .....
मज न आता थोडकी आशा कुणी की 'वा' म्हणा
आज मी माझ्याचसाठी गुणगुणाया लागलो .....
काय हे आयुष्य माझे, काय हे जगाने तरी
मला सोडून मी सर्वांना आवडाया लागलो .....
No comments:
Post a Comment