Friday, December 11, 2009

हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्ततम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हें तूतें । वंदना
करि अंतःकरणज तुज, अभि- नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची । चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

हा भग्न तट असे गडागडाचा आजी
हा मग्न आज जयदुर्ग आंसवांमाजी
ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनी भवानी दे न कुणा आधारा
गड कोट जंजिरे सारे । भंगले
जाहलीं राजधान्यांची । जंगले
परदास्य-पराभविं सारीं । मंगले
या जगति जगूं ही आज गमतसे लज्जा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी
जी बुद्धि पांच शाहींस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्धि हेतुची कर्मी । राहुं दे
ती बुद्धि भाबड्या जीवां । लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं । वाहुं दे
दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थें तुज ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

सागरा प्राण तळमळला

ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा, प्राण तळमळला

भूमातेच्या चरणतला तुज धूता
मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशि चल जाऊ
सृष्टिची विविधता पाहू
त‍इं जननीहृद्‌ विरहशंकितहि झाले
परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन
त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी
जगद्‌नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्ती उद्धरणी मी
येईन त्वरे, कथुनि सोडिले तिजला
सागरा, प्राण तळमळला

शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी
ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु या पुढती
दशदिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे
की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा
हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता, रे
नवकुसुमयुता त्या सुलता, रे
तो बाल गुलाबहि आता, रे
फुलबाग मला, हाय, पारखा झाला
सागरा, प्राण तळमळला

नभि नक्षत्रे बहुत, एक परि प्यारा
मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य, परी मज भारी
आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिया साचा
वनवास तिच्या जरि वनिचा
भुलविणे व्यर्थ हे आता, रे
बहु जिवलग गमते चित्ता, रे
तुज सरित्पते जी सरिता, रे
त्वद्‍अविरहाची शपथ घालितो तुजला
सागरा, प्राण तळमळला

या फेनमिषें हससि निर्दया कैसा
का वचन भंगिसी ऐसा ?
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते
भिउनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबला म्हणुनि फसवीसी
मज विवासनाते देशी
तरि आंग्लभूमी भयभीता, रे
अबला न माझि ही माता, रे
कथिल हे अगस्तिस आता, रे
जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा, प्राण तळमळला

For Download
http://www.4shared.com/download/111309428/693bc031/SAGARA_PRAN_-_LATA_MINNA.mp3?v=1

जयोस्तुते श्रीमहन्मंगले

जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे

राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची
स्वतंत्रते भगवती ! श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभात तूची आकाशी होसी
स्वतंत्रते भगवती ! चांदणी चमचम लखलखसी
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती ! तूच जी विलसतसे लाली
तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची
स्वतंत्रते भगवती ! अन्यथा ग्रहण नष्ट तेची
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

मोक्ष-मुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती ! योगिजन परब्रम्ह वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवती ! सर्व तव सहचारी होते
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

हे अधम-रक्तरंजिते, सुजन पूजिते, श्रीस्वतंत्रते
तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण, चराचर शरण, श्रीस्वतंत्रते
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे














Wednesday, November 25, 2009

Sir Isaac Newton



Sir Isaac Newton (4 January 1643 – 31 March 1727) -
      Sir Isaac Newton was an English physicist, mathematician, astronomer, natural philosopher, alchemist, and theologian.

 

 

 

Newton's apple - Newton himself often told the story that he was inspired to formulate his theory of gravitation by watching the fall of an apple from a tree.

Cartoons have gone further to suggest the apple actually hit Newton's head, and that its impact somehow made him aware of the force of gravity. It is known from his notebooks that Newton was grappling in the late 1660s with the idea that terrestrial gravity extends, in an inverse-square proportion, to the Moon; however it took him two decades to develop the full-fledged theory.




Reputed descendants of Newton's apple tree, at the Botanic Gardens in Cambridge and the Instituto Balseiro library garden





     

Friday, September 18, 2009

१ मे १९६० .....

मे १९६० - महारष्ट्र दिन

Friday, August 28, 2009

शाहीर योगेश यांचा पोवाडा - धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज

देश धरम पर मिटने वाला।
शेर शिवा का छावा था।।
महापराक्रमी परम प्रतापी।
एक ही शंभू राजा था।।
तेज:पुंज तेजस्वी आँखें।
निकल गयीं पर झुका नहीं।।
दृष्टि गयी पण राष्ट्रोन्नति का।
दिव्य स्वप्न तो मिटा नहीं।।
दोनो पैर कटे शंभू के।
ध्येय मार्ग से हटा नहीं।।
हाथ कटे तो क्या हुआ?।
सत्कर्म कभी छुटा नहीं।।
जिव्हा कटी, खून बहाया।
धरम का सौदा किया नहीं।।
शिवाजी का बेटा था वह।
गलत राह पर चला नहीं।।
वर्ष तीन सौ बीत गये अब।
शंभू के बलिदान को।।
कौन जीता, कौन हारा।
पूछ लो संसार को।।
कोटि कोटि कंठो में तेरा।
आज जयजयकार है।।
अमर शंभू तू अमर हो गया।
तेरी जयजयकार है।।
मातृभूमि के चरण कमलपर।
जीवन पुष्प चढाया था।।
है दुजा दुनिया में कोई।
जैसा शंभू राजा था?।।
- शाहीर योगेश

"कणा"


Thursday, August 13, 2009

संदीप खरे - आज मी आयुष्य .....

आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो
नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो .....

शोधले माझेच पत्ते आत मी माझ्या किती
जरा हरवलो तेव्हाच कोठे सापडाया लागलो .....

ठरवले हे पाहीजे, ते पाहीजे, ते ही हवे
मागण्या ताज्या तवान्या मी धकाया लागलो .....

मी सुखला पाळले बांधून दरी माझीया
ते सुखाने झोपले मी गस्त द्याया लागलो .....

गीत माझ्या लेखणीचे इतुके भिनले तिला
ती लिहाया बैसली अन मी सुचाया लागलो .....

मज न आता थोडकी आशा कुणी की 'वा' म्हणा
आज मी माझ्याचसाठी गुणगुणाया लागलो .....

काय हे आयुष्य माझे, काय हे जगाने तरी
मला सोडून मी सर्वांना आवडाया लागलो .....

Monday, August 3, 2009

छत्रपति शिवाजी महाराज .....































"निश्चयाचा महामेरू|
बहुत जनांसी आधारू|
अखंड स्थितीचा निर्धारू|
श्रीमंत योगी|"
-- श्रीसमर्थ रामदासस्वामी

Tuesday, July 28, 2009

संदीप खरे - अताशा असेहे मला काय होते

अताशा असेहे मला काय होते, कुण्या काळचे,
कुण्या काळचे पाणी डोळयात येते,
अताशा असेहे मला काय होते,
कुण्या काळचे पाणी डोळयात येते

बरा बोलता बोलता स्तबद्ध होतो - २
कशी शांतता शून्य शब्दात येते,
अताशा असेहे मला काय होते,
कुण्या काळचे पाणी डोळयात येते

कधी दाटू येता पसरा घनांचा,
कसा सावाळा रंग होतो मनाचा,
असे हालते आत हळुवार कही - २
जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्यांचा,
अताशा असेहे मला काय होते,
कुण्या काळचे पाणी डोळयात येते,

असा ऐकू येतो क्षणांचा इशारा - २
क्षणी वर्थ होतो दिशांचा पसरा,
नभातुनी ज्या रोज जातो बुडोनी - २
नभाशीच त्या मागू जातो किनारा,
अताशा असेहे मला काय होते,
कुण्या काळचे पाणी डोळयात येते

न अंदाज कुठले न अवधान कही - २
कुठे जयाचे यायचे भान नही,
जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा - २
न कुठले नकाशे न अनुमान कही,

कशी ही अवस्था कुणाला कळावी,
कुणाला पुसावी कुणी उत्तरावी - २
किती खोल जातो तरी तोल जातो - २
असा तोल जाता कुणी सावरावे,
अताशा असेहे मला काय होते,
कुण्या काळचे पाणी डोळयात येते

बरा बोलता बोलता स्तबद्ध होतो - २
कशी शांतता शून्य शब्दात येते,
अताशा असेहे मला काय होते,
कुण्या काळचे पाणी डोळयात येते.