जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची स्वतंत्रते भगवती ! श्रीमती राज्ञी तू त्यांची परवशतेच्या नभात तूची आकाशी होसी स्वतंत्रते भगवती ! चांदणी चमचम लखलखसी वंदे त्वामहं यशोयुतां वंदे गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती ! तूच जी विलसतसे लाली तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची स्वतंत्रते भगवती ! अन्यथा ग्रहण नष्ट तेची वंदे त्वामहं यशोयुतां वंदे मोक्ष-मुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती स्वतंत्रते भगवती ! योगिजन परब्रम्ह वदती जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते स्वतंत्रते भगवती ! सर्व तव सहचारी होते वंदे त्वामहं यशोयुतां वंदे हे अधम-रक्तरंजिते, सुजन पूजिते, श्रीस्वतंत्रते तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण तुज सकल चराचर शरण, चराचर शरण, श्रीस्वतंत्रते वंदे त्वामहं यशोयुतां वंदे | ||
“One who has control over the mind is tranquil in heat and cold, in pleasure and pain, and in honor and dishonor; and is ever steadfast with the Supreme Self.” ~ Bhagavad Gita
Friday, December 11, 2009
जयोस्तुते श्रीमहन्मंगले
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment